नमस्कार मंडळी आपण सर्व जणांनी आपल्या आजी कडून लहानपणी भुतांच्या गोष्टी ऐकल्या असतील आणि रात्री च्या वेळी भीती वाटायची ती गोष्टच न्यारी होती, आजीने सांगितलेले एक न एक पात्र डोळ्यासमोर उभं राहायचं आणि मग भीतीने थरकाप उडायचा. पण आताच्या जमान्यात हे सर्व हरवून गेलेय ना आजीच्या गोष्टी ना आजी, आता आजीची जागा युट्युब (YouTube), जिओ हॉट स्टार (JioHotstar), नेटफिल्क्स (Netflix) यांसारख्या प्लॅटफॉर्म्सनी घेतली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

एव्हाना भयकथेची पुस्तके देखील आपल्या जवळ असताना आपण त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही. भयकथा लिहिणारे लेखक जसे कि नारायण धारप, यशवंत रांजणकर खूप प्रसिद्ध असले तरी आपण आताच्या जमान्यात वाचन करणे सोडून दिलेय आणि नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे ऑडिओ बुक (Audio Book). उदाहरणार्थ KUKUFM, Audible, Libro.FM, Everand, Chirp

आजकालचे भयपट तशे खास भयावह नसतात, भीती वाटायची सोडून हसून हसून पोट दुखत पण हॉलिवूड चे चित्रपट तसे खूप भीती दायक असतात. आणि त्यांच्या कथाही युनिक असतात. आम्ही तुमच्या साठी अशीच एकी अद्वितीय नवी अशी मूवी review करतोय जीच नाव आहे ब्रमयुगम (Bramayugam Movie). मुखत्वे ही कथा केरळ मधील असून खूप भाषांमध्ये डब तुम्हाला पाहायला भेटतील. हा चित्रपट ड्रामा/हॉरर या केटेगेरी मध्ये मोडत असून कथा एकूण २ तास १९ मिनिटांची आहे.

Bramayugam Movie Review in Marathi
Bramayugam Movie Review in Marathi

ब्रमयुगम (Bramayugam Movie) चित्रपटाला IMDB वर १० पैकी ७.८ चे रेटिंग आहे तर गूगल च्या अहवाला नुसार हा चित्रपट पाहणाऱ्या १०० लोकांपैकी ९० लोक या चित्रपटाला पसंती देतात. दिग्दर्शन व लेखन स्वतः राहुल सदाशिवण (Rahul Sadasivan) यांनी केले असून मामूटी (Mammootty), अर्जुन अशोकन (Arjun Ashokan), सिद्धार्थ भारतन (Sidharth Bharathan) यांनी अप्रतिम असा अभिनय सादर केला आहे. या चित्रपटाचे बजेट ₹२७.७३ कोटी असले तरी बॉक्स ऑफीस वर ₹८५ कोटी कमाई केली आहे. हा चित्रपट २०२४ साली प्रदर्शित झाला असला तरी अजून ही लोक हा चित्रपट पाहतात कारण या चित्रपटाची कथा त्याला जिवंत ठेवते. अगदी नवीनतम कथा असणारा चित्रपट सर्वानी पाहाण्याजोगा आहे.

ब्रमयुगम (Bramayugam Movie) या चित्रपटाची सुरुवातच सुंदररित्या प्रस्तुत केली आहे, १७ व्या शतकातील मलबारमध्ये, थेवन आणि कुराण (कथेतील पात्र) एका अपरिचित, जंगली भागात येतात आणि रात्रीसाठी तिथेच राहतात. रात्रीच्या वेळी, एका यक्षीने कुराणला भुरळ घातली आणि मारले. अगदी या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकाला पुढे काय घडणार आहे याच कुतूहल वाटू लागत आणि हेच कुतूहल त्याला चित्रपट शेवट पर्यंत पाहण्यास भुरळ पाडते.

चित्रपटामध्ये पुढे, सकाळी थेवन पळून जातो आणि त्याला एक भकास वाडा दिसतो. उपासमार टाळण्यासाठी तिथे ठेवलेले नारळ तो फोडण्याचा प्रयत्न करत असताना, घरातील स्वयंपाकी त्याला सापडतो. त्याला वाडा मालक कोडुमोन पोटी यांच्यासमोर आणले जाते, जो त्याचा ठावठिकाणा विचारतो आणि तो पानन (लोक गायक) असल्याचे कळल्यावर, तो त्याला त्याच्यासाठी गाण्याची विनंती करतो. खऱ्या कथेला इथून सुरुवात होते.

कथेचा सारांश सांगायचा झाला तर, १७ व्या शतकातील केरळमधील एका लोकगायकाला गुलामगिरीतून पळून जाताना एक हवेली सापडते. आत त्याला एका गूढ स्वयंपाकी आणि एका शक्तिशाली मालकाची भेट होते, ज्यामुळे त्याचे जीवन बदलणाऱ्या घटनांची साखळी सुरू होते.

पोट्टी गाण्यावर थेवनचे कौतुक करतो आणि त्याला सोडून जाण्याची इच्छा असूनही आयुष्यभर येथेच राहण्याचा आग्रह धरतो. स्वयंपाकी, थेवनला त्याची खोली दाखवत असताना, त्याला घराबद्दल प्रश्न विचारण्यापासून किंवा मर्यादेबाहेर असलेल्या कोणत्याही क्षेत्राची तपासणी करण्यापासून परावृत्त करतो. पुढील काही दिवसांत, त्याला स्वयंपाकीकडून कळते की पोट्टी हा जादूगार चुडाला पोटीचा वंशज आहे, ज्याला देवी वराहीने एक गूढ भूत मदतनीस, चथान (भूत) भेट दिली होती. चथानवर त्याचा सततचा छळ सूड घेण्यासारखा बनला आणि त्यातून चुडाला पोटी आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू झाला. कोडुमोन पोटी, स्वतः एक मजबूत जादूगार, अखेर चथानचा पराभव करतो आणि त्याला हवेलीच्या अटारीत बेड्या ठोकतो.

चित्रपटामध्ये पुढे जे काही प्रतुत केले आहे ते खरच कौतुकास्पद आहे, कॅमेरा अँगल्स, विसुअल्स कथेला अप्रतिम बनवतात. चित्रपटाचा शेवट किंवा पुढचा भाग मी इथे लिहत नाहीये कारण चित्रपट पाहण्याची मजा वेगळीच आहे, अगदी शेवट पर्यंत आपल्याला खेळवत राहते. हा चित्रपट अप्रतिम असला तरी याला मास्टरपीस म्हणता येणार नाही कथा त्या लेवल ला बरी आहे. आम्ही या चित्रपटाला १० पैकी ७.५ चे रेटिंग देत आहोत.

FAQ(वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

१. ब्रमयुग हिट झाला की फ्लॉप? (Is Bramayugam hit or flop?)

ब्रमयुग चित्रपट हिट झाला किंवा फ्लॉप झाला हे जाणून घेण्यापेक्षा हा कसा प्रस्तुत केला गेलाय आणि पात्रांचा अभिनय खरच कसा कौस्तुकास्पद आहे जे जाणणं महत्वाचं आहे तसे पण बॉक्स ऑफीसवर ८५ कोटीची कमाई केली आहे व IMDB वर या चित्रपटाला ७.८ चे रेटिंग आहे.

२. ब्रमयुग पाहण्यासारखा आहे का? (Is Bramayugam worth watching?)

हो नक्कीच, कारण या चित्रपटाची कथा अद्वितीय युनिक आहे जी प्रेक्षकाला शेवट पर्यंत चित्रपट पाहण्यास भुरळ व जखडून ठेवते कि पुढच्या क्षणी काय घडेल.

३. ब्रमयुगाचा सारांश काय आहे? (What is the summary of Bramayugam?)

१७ व्या शतकातील केरळमधील एका लोकगायकाला गुलामगिरीतून पळून जाताना एक हवेली सापडते. आत त्याला एका गूढ स्वयंपाकी आणि एका शक्तिशाली मालकाची भेट होते, ज्यामुळे त्याचे जीवन बदलणाऱ्या घटनांची साखळी सुरू होते. असा या छत्रपटाचा सारांश आहे.

४. ब्रमयुग चित्रपटाचा संदेश काय आहे? (What is the message of the movie Bramayugam?)

'ब्रमयुग' चित्रपटाचा मुख्य संदेश म्हणजे, “शक्तीचा गैरवापर नेहमीच हानिकारक असतो.” या चित्रपटात, अत्याचारी लोकांनी शक्तीचा कसा गैरवापर केला आणि त्याचा परिणाम नेहमीच नकारात्मक कसा असतो हे दाखवले आहे. चित्रपटातील हा संदेश अतिशय योग्यरीत्या प्रस्तुत केला आहे.

ब्रमयुगम (Bramayugam Movie Download) चित्रपट तुम्हाला पाहण्याची उत्सुकता असेल तर या लेखाच्या खाली लिंक देत आहे. तेथून डाउनलोड करा. तसेच पुढच्या लेखात नवीन नवीन मूवी शोधून घेऊन येत आहोत.हा Bramayugam Movie review कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद 🙏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने