नमस्कार मंडळी , जोशमराठी प्रेरणादायी चित्रपट या विभागात तुमचं मनपूर्वक स्वागत . जसे की तुम्हाला माहितच आहे जोशमराठी या Motivational movies भागात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल असे चित्रपट माहित करून देते. ज्यामुळे तुम्हाला तुमचे जीवन सुखकर व आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा भेटेल. तुम्ही जर व्यवसाय करू इच्छित असाल आणि त्यामध्ये तुम्हाला यश व काही पद्धती शिकायच्या असतील तर हा आजचा लेख शेवट पर्यन्त वाचा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल याची खात्री आम्ही देतो.

या आजच्या लेखात आपण पाहणार आहोत , mcdonald's the founder या चित्रपटाबद्दल. The founder movie ही खरतर एक गुपितच म्हणावं लागेल कारण mcdonald's ची खरी कहाणी (True Story of mcdonald's) कोणालाही माहित नसेल. याच गोष्टीवरून पडदा उठवण्याचे काम आज आपण करणार आहोत . जे जाणून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. चला तर मग जाणून घेऊया The founder movie review in marathi.

नक्की वाचा >> The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट

The founder movie हि एक Hollywood Movie असून २०१६ साली सिनेमा गृहात प्रदर्शित केला गेला. The founder imdb रेटिंग १० पैकी ७.२ आहे असली तरी गुगलच्या अहवालानुसार हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या १०० जणांपैकी ९० लोक या चित्रपटास पसंती देतात. Drama आणि History प्रकारात मोडणारा हा चित्रपट एकूण १ तास आणि ५५ मिनिटांचा आहे. the founder movie च्या casting विचार केला तर मुख्य नायकाचे काम हे Michael Keaton यांनी केले असून अतिशय उत्कृष्ट कलेचे सादरीकरण आहे. हा चित्रपट सत्य घडलेल्या (True Story of mcdonald's) घटनेवर आधारित आहे. जे लोक त्यांचा व्यवसाय विस्तारू पाहत आहेत किंवा अतिशय मेहनत घेत आहेत अशा लोकांसाठी तसेच व्यवसाय करू पाहणाऱ्या नवख्या लोकांसाठी हा प्रेरणादायी चित्रपट आहे.

The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi-जोशमराठी
The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi-जोशमराठी

मित्रांनो हि कथा आहे mcdonald's the founder ची , असे म्हणतात कितीही मोठ्या कामाची सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून होते. जर माणसाला जगातील सर्वात मोठ्या इमारतीची निर्मिती करायची असल्यास त्याची सुरुवात देखील लहानशा वीटे पासून होते. खरतर हि कथा सुरु होते १९५४ सालापासून. कथेचा नायक रे क्रोक आहे. त्यांनी ऍम्ब्युलन्स च्या ड्रायव्हर चे काम केले शिवाय त्यांनी एका म्युसिक बँड मध्ये पियानो वाजवण्याचे काम केले ,सेल्समन बनून पेपर कपही विकले तसेच रिअल इस्टेट चे हि काम केले पण १९५४ साली ते ५२ वर्षाचे झाले तरी त्यावेळी ते मिल्कशेक मिक्सर विकण्याचे काम करत आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य आरामात घालवण्यासाठी काही पैसे जमा करून ठेवलेत त्यांची पत्नी देखील त्यांना खूप आधार देतेय.

नक्की वाचा -- सुझुमे नो टोजिमारी (Suzume) movie review in marathi

रे क्रोक त्यांच्या आयुष्यात अजून खूप काही करू इच्छितात आणि त्यासाठीच ते खूप मेहनत घेत आहेत. चित्रपटाची खरी सुरुवात जेव्हा रे त्यांच्या सेक्रेटरीला एक कॉल करतात तेव्हा सांगते की ग्राहकांच्या खूप साऱ्या तक्रारी आल्या आहेत शिवाय एक ऑर्डर हि आली आहे ज्यामध्ये ६ मिक्सर ची मागणी केली गेली आहे. या गोष्टीचे रे याना आश्चर्य वाटते कारण त्यांनी या आधी कोणत्याच ठिकाणी १ पेक्षा जास्त मिक्सर विकलेले नसतात आणि हि ऑर्डर म्हणजे ६ मिक्सर ची आहे. रे त्या Restaurant ला कॉल करून विचारतात कि खरंच तुम्हाला ६ मिक्सर हवे आहेत का आमच्या सेक्रेटरी ची चूक झाली ऐकण्यात ,तिकडून आवाज येतो हा चूक आमचीच आहे आम्हाला ६ नाही तर ८ मिक्सर हवे आहेत. रे याना राहवत नाही ते त्या उपहारगृह (Restaurant) ला भेट देण्याचे ठरवतात.

नक्की वाचा >> भारता विषयी ६० फॅक्टस - interesting facts about india.

उपहारगृहाला भेट देताना त्यांना असे जाणवते कि त्या उपहारगृह (Restaurant) जवळ खूप मोठी रांग लागली आहे. आणि तरी सुद्धा रे तेथून काहीच मिनिटांतच खाद्य विकत घेतात. ते बाहेर असणाऱ्या टेबल वर बसून खाऊ खात असतात इतक्यात एक माणूस झाडू मारत येऊन त्यांना विचारतो बर्गर कसे आहे त्यावर रे म्हणतात कि छान आहे ,त्यावर तो माणूस त्यांना सांगतो कि मी या उपहारगृह (Restaurant) चा मालक आहे , माझं नाव मॅक मॅकडोनाल्ड. काही वेळ बोलल्यानंतर मॅक ला कळते कि हा तोच माणूस आहे ज्याचा कडून आपण मिक्सर विकत घेतलेत. त्यानंतर मॅक रे ला त्यांचे Restaurant दाखवतात. तेथील व्यवस्था पाहून रे खुश होतात.

The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi-जोशमराठी
The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi-जोशमराठी

रे क्रोक ,मॅक आणि त्याचा भाऊ डिक यांना छोटीशी डिनर द्यायचा विचार करतात. ठरल्याप्रमाणे तिघे डिनरला जातात. मॅक आणि डिक दोघेही रे ला आपण हे रेस्टॉरंट कसे उघडले याबद्दल सांगतात , दोघेही खरंच मेहनती आहेत. त्यांनी पहिले रेस्टॉरंट उघडले ते खूप चालले पण त्या भागात राहणारी लोकसंख्या खूपच कमी होती. पुढे त्यांनी त्यांचे रेस्टॉरंट सॅन बर्नार्डिनो ला हलवले , पण तेथे त्यांना काही समस्या जाणवल्या त्या म्हणजे रेस्टॉरंट मध्ये खूपच गर्दी होत आहे शिवाय ऑर्डर वेळेवर मिळत नसल्याने लोक निघून जात होते. हि समस्या सोडवण्यासाठी त्यांची एक युक्ती शोधून काढली ज्यामुळे लोकांना खूपच कमी वेळात त्यांचे खाद्य भेटेल. त्यांनी खाण्याच्या वापरात येणारी धातूची भांडी न वापरता पेपर चे साहित्य वापरले ज्यामुळे त्यांना भांडी घासण्यासाठी लागणारा वेळ वाचला. तसेच त्यांनी सेल्फ सर्विस सुरु केली. त्यांनी अशी पद्धत शोधून काढली कि ज्यामुळे लोकांना त्यांची ऑर्डर ३० सेकंदाच्या आत भेटेल.

कोणतेही रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी ग्रँड ओपनिंग करावी लागते जेणेकरून त्या प्रदेशातील लोकांना रेस्टॉरंट बद्दल माहिती व्हावी आणि खूप सारे ग्राहक खेचले जातील. ठरल्याप्रमाणे त्यांनी ग्रँड ओपनिंग केली पण त्या भागात असणारे असंख्य किडे रंगेबेरंगी लाईट कडे आकर्षिले गेले आणि हा त्यांचा प्लॅन फसला. दुसऱ्या दिवस एक छोटा मुलगा तीन बर्गरची ऑर्डर करतो पण कालच्या घटनेमुळे सर्व खचून गेले असतात तरी सुद्धा त्या मुलाला त्याची ऑर्डर दिली जाते. पुढे एक गाडी mcdonald's restaurant जवळ येऊन थांबते अशा अजून ३-४ गाड्या येऊ लागतात हळू हळू गर्दी वाढते आणि अशाप्रकारे हे रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध झालेले असते.

नक्की वाचा >> अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क

रे क्रोक पुढच्या दिवशी मॅक आणि डिक ला भेटतात व या रेस्टॉरंट प्रमाणे आणखी काही फ्रॅन्चाइसी खोलण्याचे सांगतात पण डिक त्यांना सांगतात कि त्यांच्या आधीच ३-४ फ्रॅन्चाइसी आहेत आणि आम्हाला पुढे एकही खोलायची नाहीये. रे त्यांना विचारतात कि असं का ? त्यावर डिक सांगतात Quality Control , ते लोक फ्रॅन्चाइसी मध्ये काय विकतील , त्याची Quality कशी आहे ते पाहणे खूप अवघड काम आहे. रेस्टॉरंट च्या भिंतीवर एक सुंदर चित्र असते ,रे क्रोक त्या चित्रा बद्दल विचारतात त्यावर डिक सांगतात हि एक कल्पना होती त्या चित्रातील पिवळ्या रेषा म्हणजे mcdonald's restaurant golden arch आहे. रे क्रोक या restaurant ला भेट देतात आणि त्यांचे आयुष्य बदलून जाते. असेच एक सुदंर restaurant आपले देखील असायला हवे असे त्यांना वाटते.

The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi-जोशमराठी
The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi-जोशमराठी

रे क्रोक पुढे कशाप्रकारे डिक व मॅक डोनाल्ड यांना पटवतात त्यांना फ्रॅन्चाइसी देण्यासाठी व ते कसे प्रगती करतात. येणाऱ्या अडचणी आणि होणारी कर्ज पाहून कसे ते त्यांना तोंड देतात यातच रे यांची बायको त्यांची साथ सोडते कायम त्याना रिस्क घेण्यासाठी रोखते. यावेळी कसे ते समस्या सोडवतात. ते इतके प्रगतशील होतात कि शेवटी संपूर्ण mcdonald's restaurant च विकत घेतात. हे पाहताना खरंच मन भरून जाते. कशाप्रकारे डिक आणि मॅक डोनाल्ड याना माघार घ्यावी लागते. एक उद्योजक (Entrepreneur) कशाप्रकारे विचार करतो आणि आपल्याला हवं ते साध्य करतो याची प्रचिती या mcdonald's the founder या चित्रपटातून पाहायला मिळते. मित्रानो हा चित्रपट तुम्ही नक्की पहा तुमच्यामध्ये नक्कीच बदल घडेल.

The founder movie मधून मला काय शिकायला मिळाले ?

मंडळी खरं सांगायचं झालं तर मी नेहमीच असे चित्रपट पाहतो जेणे करून मला त्याचा काहीतरी फायदा व्हायला हवा. नाहीतर दिवसातल्या २४ तासांपैकी मग २-३ तास व्यर्थ घालवण्या सारखे आहे. मी माझ्या आयुष्यातील कठीण काळातून जात होतो तेव्हा मी हा चित्रपट पाहिला आणि ठरवूनच टाकले स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा. ठरवल्याप्रमाणे मी स्वीट मार्ट चा व्यवसाय करतोय. तसेच दुसरे मी या आधी पार्टनरशिप मध्ये काम करायचो ते न करता आता स्वतःच डिजिटल मार्केटिग करत आहे. जोश मराठी डॉट कॉम हे त्याचेच फलित आहे. पैसे कमवण्याच्या नवनवीन वाटा शोधात आहे. मित्रानो कोणतीही गोष्ट करताना एकच मनाशी गाठ बांधा ती म्हणजे टॉप (१st Place) ला जाणे. कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही.

या चित्रपटातून मला एक व्यवसायिक किंवा उद्योजक कशाप्रकारे विचार करतो, आलेल्या समस्यांना तोंड कसे द्यायचे. कसे स्वतःला नेहमी सकारात्मक दृष्टिकोनात टिकून ठेवायच? या गोष्टी उत्तमरीत्या समजल्या. रिस्क घेण्यासाठी प्रेरणा मिळाली.

नक्की वाचा >> पृथ्वी बाबत ५० तथ्ये - Interesting Facts about Earth व संपूर्ण माहिती

The founder movie review in marathi तुम्हाला इंटरनेट वर पाहायला मिळतीलच शिवाय The founder movie full movie - YouTube वर देखील मोफत पाहू शकता. Movies flix सारख्या Website वरून तुम्ही हा चित्रपट डाउनलोड करू शकता.

मंडळी The founder movie नक्कीच पहा ती खूप उत्कृष्ट आणि प्रेरणादायी आहे. हा चित्रपट The founder Online Netflix वर पाहू शकता. या लेखातून आपण The founder movie review in marathi पाहिला. आम्हाला आशा आहे कि हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि काही शंका असतील तर कॉमेंट करून सांगायला विसरू नका.

My Rating - ८*/१०

जोशमराठी डॉट कॉम नेहमीच ज्ञान-रंजन आणि प्रेरणादायी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असते. तुम्ही नक्की तुमचा अभिप्राय कळवा त्यामळे आम्हाला नवनवीन लेख लिहण्यास प्रेरणा भेटेल. हा लेख तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रीनिसोबत शेयर करू शकता. दररोज नावीन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट देत राहा. धन्यवाद... !!

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने