नमस्कार मंडळी प्रेरणादायी चित्रपट या जोशमराठी संकेतस्थळाच्या विभागात तुमचे स्वागत आहे. मित्रांनो सर्व जण खूप सारी स्वप्न मनाशी बाळगून जीवन जगत राहतात , तुम्ही हि खूप सारी स्वप्न पाहिली असतीलच. पण त्या स्वनांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती धडपड करता , किती मेहनत घेता , नवनवीन योजना आखता ? आता हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही नक्कीच विचारात पडाल की " मी काय करतोय माझी स्वप्नपूर्ण करण्यासाठी ?" काही वेळा याची उत्तरे तुम्हाला भेटणारच नाहीत. कारण तुम्ही स्वप्न तर भरपूर पाहिली पण त्या स्वप्नांचा पाठलाग कधीच नाही केलात.

मंडळी एक समीकरण लक्षात घ्या. माणसाला त्याच्या आयुष्यात सफलता (Success) कधी मिळते. तर त्याच उत्तर आहे ते म्हणजे न थकता अथक परिश्रम करत राहणे. समजा जर श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहत असाल तर त्यासाठी परिश्रम , म्हनजे तुम्ही तुमचे गोल्स (Goals) ठरवले पाहिजेत. जसे Short Term Goals , Mid Term Goals आणि Long Term Goals. आता तुम्हाला ठरलेल्या गोल प्रमाणेच जायचं आहे. नेहमी आपल्या गोल वर फोकस (Focus) लक्ष ठेवले पाहिजे.

पैसे कमवण्याचा हजारो वाटा शोधल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे स्वतःला नेहमी सकारात्मक (Positive) ठेवलं पाहिजे. नकारात्मक लोकांची साथ सोडा . स्वतःला सांगा तू हे यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतोस, प्रयत्न कर. अजून प्रयत्न कर ,खूप प्रयत्न कर. अपयश आले हरकत नाही मी जिंकणारच. या अपयशापेक्षा मी मोठा आहे. ते माझे काही बिघडवू शकत नाहीत. दुप्पट ,चौपट मेहनत घेईन आणि सर्वाना एक दिवस दाखवून देईन मी करून दाखवलं ,मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार.

The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट-जोशमराठी
The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट-जोशमराठी

मित्रानो आज या लेखात आपण अश्याच एका चित्रपटाबाबत पाहणार आहोत ज्याचं नाव आहे , दि परसूट ऑफ हॅप्पीनेस (The Pursuit of happyness Movie review in marathi) आपण आपल्या सर्व गोष्टी नशिबावर सोडून देतो खरतर आपलं नशीब आपणच घडवायचं असत. गरिबी काय असते आणि त्यांना कस प्रत्युत्तर द्यावं , परिश्रम -मेहनत काय असते ते या दि परसूट ऑफ हॅप्पीनेस (The Pursuit of happyness) या चित्रपटातून पाहावयास मिळते.

नक्की वाचा >> अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क

एकंदरीत म्हणायचे झाले तर हा चित्रपट त्या लोकांसाठी आहे जे आयुष्यात येणाऱ्या खूप साऱ्या अडचणींना सामोरे जात आहेत. स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी झगडत आहेत. मित्रानो खरंच तुम्ही हा The Pursuit of happyness चित्रपट नक्कीच पहा. तुम्हाला एक वेगळीच दिशा मिळेल आणि तुम्ही खचून जाणार नाहीत याची खात्री देतो. हा चित्रपट एक हॉलीवूड मूवी असून त्याचे IMDB वर १० पैकी ८ चे रेटिंग आहे. हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला असून गुगलच्या अहवालानुसार हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या १०० लोकांपैकी ९५ लोक या चित्रपटाला पसंती देतात. या चित्रपटाचा मुख्य नायक विल स्मिथ (Will Smith) असून दिग्दर्शक गॅब्रिएल मुसिनो (Director-Gabriele Muccino) आहेत. हा चित्रपट १ तास ५७ मिनिटांचा असला तरी या चित्रपटातून खूप काही शिकण्यासारख आहे.

The Pursuit of happyness या चित्रपटामध्ये बाप आणि मुलाचं नातं उत्कृष्टरित्या मांडले आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. जी ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यवर प्रस्तुत केली आहे. या चित्रपटाचे सौंदर्य म्हणजे त्याची प्रामाणिकपणा तसेच कसा एक माणूस सर्व काही संपल्यानंतर हि आपल्या मुलासाठी संपूर्ण जगाशी लढा देतो जोपर्यंत तो त्याचे लक्ष गाठत नाही हे अगदी सुदंररित्या प्रेक्षकांसमोर मांडले आहे. चित्रपटातील नायक ख्रिस हा कुठे नोकरी करत नाही तर तो मेडिकल स्कॅनर विकण्याचे काम करतो. हे स्कॅनर एक्स रे चे काम करते पण त्याची Quality खूप चांगली असते. ख्रिस ला त्याचे घर चालवण्यासाठी प्रत्येक महिन्याला २ स्कॅनर विकावेच लागतात. पण काही काळ त्याने एकही स्कॅनर विकलेला नसतो.

नक्की वाचा -- The Founder -प्रेरणादायी Movie review in marathi

ख्रिस त्याचे काम करायला जात असताना वाटेत त्याला एक माणूस दिसतो त्याच्याकडे महागडी गाडी आणि त्याने एक किमती सूट परिधान केलेला असतो. ख्रिस त्या माणसाला विचारतो तुम्ही काय काम करता आणि हे तुम्ही कसे करता , यावर तो माणूस त्याला सांगतो मी एक स्टॉक ब्रोकर आहे. त्यावर ख्रिस त्याला म्हणतो हे सर्व करण्यासाठी कॉलेज ला जावं लागत असेल. तर तो म्हणूस त्याला म्हणतो ,नाही फक्त मला लोकांशी चांगल्या पद्धतीने बोलायचे असते. ख्रिस पाहतो कि तेथिल आजूबाजूचे लोग खूप खुश आहेत. ख्रिस मनातल्या मनात विचार करू लागतो मी हि खूप मेहनत करेन आणि या लोकांप्रमाणे कायम खुश राहीन.

ख्रिसच्या परिवाराची आर्थिक परिस्तिथी खूपच खराब आहे आणि त्यांनी त्यांचे घराचे भाडे देखील नाही भरले. आता ख्रिस मनाशी ठरवतो कि तो स्टॉक ब्रोकर ची नोकरी करेल , त्यासाठी तो त्या फर्म मध्ये जाऊन चौकशी करेल. हे सर्व तो त्याची बायको लिंडाशी चर्चा करतो पण लिंडा त्याची मस्करी करते कारण ख्रिस खूपच कमी पैसे कमावतो आणि घर चालवण्यासाठी लिंडाला दोन शिफ्टमध्ये काम करावं लागतेय. ख्रिस त्या फर्म ला भेट देऊन फॉर्म घेतो. ख्रिसच्या कमी पगारामुळे लिंडा त्याला निष्काळजी समजते आणि ख्रिस पासून दूर जाण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न ,ती खूप वेळापासून करतेय. ख्रिस पुढे एकही स्कॅनर विकू शकत नाही त्यामुळे त्यांच्या राहण्या खाण्याची खूप बिकट अवस्था होते. तेव्हा लिंडा त्याचा मुलगा खिस्तोफर ला घेऊन घर सोडून जाते.

नक्की वाचा -- सुझुमे नो टोजिमारी (Suzume) movie review in marathi

पुढच्या दिवशी ख्रिस ख्रिस्तोफर ला शाळेतून त्याचा घरी घेऊन जातो कारण तो त्याच्या मुलावर खूप प्रेम करत असतो. ते दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत. ख्रिस्तोफर नाश्ता करत असताना त्याचा घर मालक येतो व घरभाड्याची मागणी करतो त्यावर ख्रिस त्याच्याकडून एका आठवड्याची मुदत घेतो त्याबदल्यात त्याला पूर्ण घर रंगवावे लागते . इतक्यातच काही पोलीस त्याच्या घरी येतात कारण ख्रिस ने त्याची गाडी पार्क केलेल्या जागेतून पोलिसानी नेवून खूप काळ लोटला तरी त्याचे बिल दिलेले नसते. तो ते बिल देण्यासाठी निघून जातो पण पोलीस त्याला तुरुंगात टाकतात. ख्रिस लिंडाला फोन करून ख्रिस्तोफर ला शाळेतून घरी घेऊन जाण्याचे सांगतो.

The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट-जोशमराठी
The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट-जोशमराठी

पुढच्या दिवशी ख्रिसची मुलाखत ठरलेली असते. त्या सकाळी पोलिस त्याला सोडून देतात. मुलाखतीसाठी काहीच वेळ शिल्लक राहिलेला असतो त्यामुळे तो आहे त्याच वेशात (घराला रंग देताना वापरलेलं मळके घाण कपडे) मुलाखत देण्यासाठी जातो. मुलाखत घेणारे जेव्हा ख्रिसला पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. ख्रिस घडलेली सगळी घटना त्यांना सांगून टाकतो. त्या फर्म चे मालक ख्रिस ला चांगले ओळखतात ,तो खूप मेहनती आहे हे त्यांना माहित असते. त्या व्यक्तींमधील एक जण ख्रिस ला विचारतो, जर एक माणूस अतिशय मळके कपडे घालून मुलाखत द्यायला आला असेल तर तुम्ही त्याचा बाबतीत काय विचार कराल त्यावर ख्रिस म्हणतो मी विचार करेन कि त्याने चांगली पॅन्ट घातलेली असेल आणि त्याचा या उत्तरावर सर्व हसायला लागतात. आणि ख्रिसला निवडले जाते.

नक्की वाचा >> पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता

इंटर्न शिप करते वेळी ६ महिने काहीच पगार नाही , ६ महिन्यानंतर २० लोक जे निवडले गेलेत त्यांच्यापैकी एकालाच नोकरीवर पात्र म्हणून घेतले जाईल. हे जेव्हा ख्रिस ला समजते तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते . या वेळी ख्रिसकडे पोट भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. ख्रिस हि नोकरी करायची कि नाही हे पाहू लागतो कारण सहा महिन्यानंतर जर त्याला नोकरी नाही मिळाली तर ... , शेवटी त्याला त्याचा मुलगा क्रिस्तोफर चे देखील पालन करायचे आहे. या बिकट आर्थिक परीस्थित लिंडा देखील त्याला सोडून निघून जाते. आता ख्रिस ला घरभाडे न दिल्याने घर सोडावे लागते. एकंदरीत ख्रिस वर आता फुटपाटवर राहायची अवस्था येते.

ख्रिस पुढे आपल्या मुलासोबत कसा राहतो ? त्यांना कोणकोणत्या कठीण परिस्थितीना तोंड द्यावे लागते. कसे टॉयलेट मध्ये राहून दिवस काढतात. एक एक प्रसंग पाहून अक्षरशः अंगावर शहरे येतात. तुम्ही मनाने हळवे असाल तर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इतके घडून देखील ख्रिस त्यावर कशी मात करतो हे पाहताना आपल्या अंगात एक वेगळीच शक्ती येते. मला या चित्रपटाची कथा रिव्हिल नाही करायची. हा एक सर्वोत्तम प्रेरणादायी चित्रपट आहे. तो तुम्ही नक्की पहा, तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल.

The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट-जोशमराठी
The Pursuit of happyness - जगायला शिकवणारा चित्रपट-जोशमराठी

The Pursuit of happyness या चित्रपटातून मला काय शिकायला मिळाले :

दि परसूट ऑफ हॅप्पीनेस (The Pursuit of happyness Movie review in marathi) या चित्रपटातून मला काय शिकायला मिळाल जसे आपण पाहिलेल्या स्वप्नांचीपूर्ती करताना अतोनात कष्ट आणि मेहनत घेण्याची तयारी असायला हवी. शेवटी तुम्ही फक्त स्वप्न पाहतात आणि त्यांना सत्यात उतरवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत तर मग अशा स्वप्नाना काहीच अर्थ उरत नाही. स्वप्न ती असतात जे माणसांची झोप उडवतात. या स्वप्नांचा पाठलाग करत असताना अगदी तुमच्या नशिबी अपयश आले , तुम्ही फुटपाथवर आलात तरी खचून न जाता शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द मनाशी घट्ट बांधली पाहिजे.

नक्की वाचा >> भारतातील ११ रहस्यमयी मंदिरे (Top 11 Mysterious temples)

मंडळी तर आता आपण थोडक्यात दि परसूट ऑफ हॅप्पीनेस रिव्हिव्ह (The Pursuit of happyness Movie review in marathi) पाहिला. मला आशा आहे कि हा लेख नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. तसेच हा चित्रपट देखील पाहाल व त्याद्वारे तुम्हाला एक वेगळा संदेश भेटेल. मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि काही शंका असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका.

The pursuit of happiness quotes तुम्हाला इंटरनेट वर पाहायला मिळतीलच शिवाय The pursuit of happyness full movie - youtube वर देखील मोफत पाहू शकता. Movies flix सारख्या Website वरून तुम्ही हा चित्रपट डाउनलोड करू शकता.

My Rating - ९*/१०

जोशमराठी डॉट कॉम नेहमीच ज्ञान-रंजन आणि प्रेरणादायी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असते. तुम्ही नक्की तुमचा अभिप्राय कळवा त्यामळे आम्हाला नवनवीन लेख लिहण्यास प्रेरणा भेटेल. हा लेख तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रीनिसोबत शेयर करू शकता. दररोज नावीन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट देत राहा. धन्यवाद... !!

2 टिप्पण्या

  1. शुभम सुतार सर, तुमच्या द्वारे दिलेली प्रत्येक माहीती खुपच उपयुक्त तसेच रोचक आणि मनोरंजक असते. तसेच तुमचा हा आर्टिकल सुद्धा बरेच काही जिवनाबद्दल सांगतोय...खुपच छान लेख होता...😊😊😊

    उत्तर द्याहटवा
  2. दिपक सर , तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल तुमचे खूप आभार.
    असेच आमच्या संकेतस्थळाला नियमित भेट देत राहा 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने