प्रत्येक भारतीयांसाठी आधारकार्ड (Aadhar Card), इलेकशन कार्ड (Voting Card) , पॅन कार्ड (Pan Card) हे त्यांचे ओळख प्रदान करण्याचे प्रमाण बनून गेले आहे. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात सर्वत्र यांचा वापर केलाच जातो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाजवळ हि प्रमाणें असणे फार महत्वाचे बनले आहे. प्रत्येक भारतीयासाठी पॅन कार्ड हे मह्त्त्वाचे ओळखपत्र आहे. भारतात कायमस्वरूपी खाते क्रमांक (Pan Card) एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. आपल्याकडे ५०,००० पेक्षा जास्त रक्कम असल्यास आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता भासेल.
नक्की वाचा >> काळ्या मुंग्या Black Ants का चावत नाहीत ?
प्रत्येक भारतीयासाठी पॅन कार्ड हे मह्त्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. हेच पॅनकार्डदेखील आपल्याकडे नसेल व ते आपण बनवू इच्छित आहात तर आता पैसे देण्याची कोणालाही गरज भासणार नाही. आपण अगदी चुटकी सरशी कोणत्याही समस्येशिवाय घर बसल्या आपण स्वतः पॅन कार्ड तयार करू शकतो. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण पॅन कार्ड बनवणे पासून ते डाऊनलोड करण्यापर्यंत या सगळ्या कृती अगदी काहीच मिनिटांच्या वेळात पूर्ण करू शकता (Free Digital Pan card application without any charges).
पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता - जोशमराठी |
पॅन कार्ड एक अद्वितीय ओळखपत्र (Unique Identification) आहे आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये हे अत्यंत आवश्यक आहे. पॅन कार्डमध्ये 10-अंकी अल्फान्युमेरिक नंबर (Alphanumeric Number) असतो, जो आयकर विभाग (Income Tax) द्वारे निश्चित केला जातो. ही प्रक्रिया सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स - Central Board For Direct Taxes (CBDT) च्या अंतर्गत येते, 1 जानेवारी 2005 पासून आपल्या कोणत्याही चलनांसह पॅनकार्ड आवश्यक झाले आहे. पॅन कार्ड हे आपल्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे आकाराचे असते आणि त्यात आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, स्वाक्षरी, आपला फोटो यासारख्या आवश्यक गोष्टी देखील असतात.
Pan Card Full Form In English / Marathi – Permanent Account Number/ कायमस्वरूपी खाते क्रमांक आहे. PAN Card बनविण्यासाठी, आपल्याला काही टिप्स खाली दिलेल्या आहेत अनुकरण करावे लागेल. हि कृती केल्यानंतर आपण आपल्या फोनवरून स्वतःचे पॅन कार्ड बनवू शकाल ते हि अगदी मोफत ,विना शुल्क. पॅन कार्ड बनवण्याची काय प्रक्रिया आहे (Free Digital Pan card application without any charges), ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात…
पॅन कार्ड (PAN Card) बनवण्याची कृती :
१) आपल्याला अधिकृत (Official) आयकर https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/ संकेतस्थळावर सर्व प्रथम भेट द्यावी लागेल, तेथे तुम्ही नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करू शकता. वर दिली गेलेली एक ई-फायलिंग संकेतस्थळ (E-Filing Website) आहे. जिथून तुम्हाला तुमचे पॅन कार्ड मिळू शकते आणि ते तुम्ही डाऊनलोड करून हि घेऊ शकता.
२) तुमचे आधार कार्ड जर तुमच्या मोबाईल फोन नंबरशी लिंक असेल, तरच ऑनलाइन पॅन कार्ड (Online PAN Card Application in marathi) बनवले जाऊ शकते. परंतु तुमचे आधार कार्ड, तुमच्या मोबाईल फोन नंबरशी जोडलेला (Linked) नसेल, तर तुम्ही या पद्धतीद्वारे आपले पॅन कार्ड (PAN Card) बनवू शकत नाहीत. यासाठी प्रथम तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या फोन नंबरशी लिंक करून घेणे फार महत्वाचे आहे. इथे फक्त पॅन कार्डच नाही,तर बर्याच अशा ठिकाणी तुम्हाला आधार कार्डवरून ओटीपी घेणे आवश्यक असतो, आधार व फोन लिंक असणे अशा स्थितीत अत्यंत आवश्यक आहे
पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता - जोशमराठी |
३) पॅन कार्डच्या बनवायच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या, तेथे तुम्हाला ‘गेट न्यू पॅन (Get New PAN)’ असा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर एक नवा फॉर्म ओपन होईल. याच फॉर्ममध्ये, तुम्हाला प्रथम आधार कार्ड नंबर भरायचा आहे आणि नंबर भरल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या बॉक्समध्ये कॅप्चा कोड (Captcha code) भरावयाचा आहे. हि कृती केल्यानंतर तुम्हाला खाली जनरेट ओटीपीवर (Generate OTP) क्लिक करावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला आधार कार्डवरून लिंक नंबरवर एक ओटीपी येईल आणि त्यानंतर एक नवे पेज ओपन होईल. त्यामध्ये ओटीपी (OTP-One Time Password) भरा आणि पुढील कृती करा (Free Digital Pan card application without any charges).
पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता - जोशमराठी |
४) आधार कार्ड (Aadhar Card) ओटीपी भरुन नंतर ‘ओके (OK)’ वर क्लिक करताच, एक नवीन पेज दिसेल त्यात आपोआप स्क्रीनवर तुमची माहिती दर्शवलेली असेल. ज्यात तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग, फोटो, पत्ता सर्व काही समाविष्ट असेल. आता एक लक्षात घ्या आपल्याला स्वतःहून पुढे काहीच तपशील भरायचा नाही. भरलेला मजकूर पडताळून पाहणे महत्वाचे आहे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला Online PAN Card Download करायचे आहे . त्यासाठी तुम्हाला पॅन रिक्वेस्ट नंबर मिळेल त्यावरून पुढील डाउनलोड ची क्रिया करावी लागेल.
‘पॅन कार्ड’ कसे डाऊनलोड करावे ? How to Download Online PAN Card ?
तुम्हाला तुमचे पॅनकार्ड डाऊनलोड (PAN Card Download) करायचे झाल्यास, थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर जावे लागेल. जिथे तुम्ही तुमचा नवीन पॅन कार्ड बनवण्याचा पर्याय निवडला होता, तिथे आता तुम्हाला ‘चेक स्टेट्स (Check Status)’ हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
नक्की वाचा >> भारतातील ११ रहस्यमयी मंदिरे (Top 11 Mysterious temples)
हि कृती केल्यानंतर एक नवीन फॉर्म ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड (Captcha code) भरावा लागेल. (Request OTP) ओटीपीची विनंती करावी लागेल. जो फोन नंबर आधारकार्डला लिंक आहे त्यावरचा OTP Code भरावा लागेल. सर्व कृती केल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड डाऊनलोड (Online PAN Card Download) वर क्लिक करा. क्लिक करताच क्षणी हे पॅन कार्ड आपोआप डाऊनलोड होऊन जाईल.
पॅन कार्ड (PAN Card) उघडण्यासाठी पासवर्डची (Password) गरज आहे.
आता तुम्हाला हा प्रश्न पडेल कि हि पासवर्डची (Password) काय नवीन भानगड आहे ,तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे हि अत्यंत सोपी पद्धत आहे. वरील कृती झाल्यानंतर आपल्या पॅन कार्डची डाउनलोड झालेली फाईल PDF स्वरूपात असेल, जी उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्डची आवश्यक भासेल. त्या PDF स्वरूपात असणाऱ्या फाईल चा पासवर्ड तुमचीच जन्मतारीख (Birthdate) असून, तो DD / MM / YYYY स्वरूपात भरावा लागेल.
उदाहरणार्थ जर, तुमची जन्मतारीख 12 डिसेम्बर 2020 असेल, तर हा पासवर्ड असेल, 12122020. अशा स्वरूपात पासवर्ड लिहून तुम्ही तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड (PAN Card Download) करू शकता. हि शेवटची कृती केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड दिसेल आणि आपण ते प्रिंट करून घेवू शकता.
मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या हि संपूर्ण प्रक्रिया करत असताना तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाहीत. हे एक डिजिटल पॅनकार्ड (Digital PAN Card) आहे. पॅन कार्ड (PAN Card) चे तुम्हाला प्लास्टिक कार्ड हवे असल्यास त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागतील.
नक्की वाचा >> Logo म्हणजे काय? Logo कसे बनवायचे ? मराठीत पूर्ण माहिती जाणून घ्या.
वरील कृतीमधून तुम्हाला Online PAN Card कसे काढावे ? हे समजले परंतु तुमच्या जवळ प्लास्टिक PAN कार्ड असेल आणि तुम्हाला डिजिटल पॅन कार्ड (Digital Pan card) हवे असल्यास एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे Google Play store मधून पॅन ऑर QR रीडर (PAN QR Code Reader) हे APP Download करावे लागेल .
हे (PAN QR Code Reader) हे APP Download केल्यानंतर तुमच्या प्लास्टिक PAN कार्ड वरील QR Code Scan करावा लागेल पण मित्रांनो इथे कि तुमचा स्मार्ट फोनचा कॅमेरा हा १२ मेगा पिक्सेल चा असणे गरजेचे आहे तरच तुम्ही पुढील कृती करू शकाल. QR Code Scan केल्यानंतर डिजिटल कार्ड तुम्हाला भेटून जाईल ते तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मध्ये ठेवू शकता.
मंडळी वरील लेखाद्वारे आपण Online PAN card कसे काढावे ते हि अगदी मोफत ,कोणतेही शुल्क न भरता. या संबंधीत माहिती पाहिली. आशा आहे कि हि माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून स्वतःचे PAN Card बनवाल.
पॅन कार्ड बनवत असताना काही अडचणी आल्या तसेच हा लेख कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आम्ही तुमची नक्कीच मदत करू. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रिय-जणांशी नक्कीच शेयर करा. जोशमराठी नेहमीच ज्ञान-रंजन विभागात रोचक व मदतगार माहिती आणत असते. धन्यवाद... !!
टिप्पणी पोस्ट करा