नमस्कार मंडळी जगात अशी अनेक रहस्ये आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण अशी रहस्ये पटण्याचाही पलीकडील असतात. आता तुम्हाला म्हंटले कि जगातील तसेच भारतातील काही ठिकाणी मासांचा पाऊस (Fish Rain) पडला आहे तर साहजिकच तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण मित्रानो ह्या सत्य घटना आहेत. आज आपण असेच एक रहस्य म्हणजे माशांचा पाऊस (Fish Rain in marathi) या विषयी जाणून घेणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल कि आकाशातून मासे कसे पडत असतील?, असा पाऊस नक्कीच पडला आहे का?.

या प्रक्रियेअंतर्गत मासे अचानक आकाशातून पडतात, तेही पावसाने. या लेखाद्वारे आपण याचा अभ्यास करणार आहोत कि हे कसे घडते. तर मंडळी हा लेख तुम्ही अगदी शेवट पर्यंत वाचा नक्कीच या लेखाचा तुम्हाला फायदा होईल. तसेच काही वेळा मुलाखतींच्यावेळी असे प्रश्न विचारले जातात. (Fish Rain in marathi) या अशा घटनांबद्दल तुम्हाला योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क-जोशमराठी
अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क-जोशमराठी

अवकाशातून मासे पडतात हे ऐकल्यावर काहींचा त्यावर विश्वास बसेल अथवा ना बसेल , पण ते सत्य आहे म्हंटल्यास काही जण त्याला देवाचा कोप झाला म्हणून असे घडत आहे हे ग्राह्य धरतील पण मित्रांनो अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आकाशातून मासे पडण्याची प्रकिया हि वैज्ञानिकदृष्ट्या व शास्त्रीयदृष्ट्या घडते हे अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे.

एकदाचे तुम्हाला या मागचे वैज्ञानिक कारण समजले तर यात तुम्हाला अलौकिक काहीही वाटणार नाही. वास्तविक हे मासे नर्क किंवा स्वर्गातून पडत नाहीत. आकाशातून पडणारे हे मासे मुख्यत्वे करून समुद्र किंवा तलावातील असतात. पण असा प्रश्न पडतो की हे मासे आकाशात कसे पोहोचतात? (Fish Rain in marathi) या लेखाच्या माध्यमातून देशातील निरनिराळ्या ठिकाणी अचानक आकाशातून मासे पडण्याच्यामागील कारण आपणास कळेल.

नक्की वाचा >> पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता

बर्‍याच शास्त्रज्ञांनी या विषयावर बरेच संशोधन केले आहे, त्यानुसार असे आढळले आहे की अशा घटना पाण्याच्या स्तर किंवा प्रचंड मोठ्या वादळामुळे घडून आल्या आहेत. जेव्हा प्रचंड मोठे वादळ समुद्र किंवा समुद्र सपाटी पार करतो, तेव्हा अशी परिस्थिती पाण्याच्या तीव्र वादळामध्ये बदलून जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर किंवा समुद्राजवळील मासे, बेडूक, कासव, खेकडे यांसारख्या जीवांना, वारे आपल्याबरोबर वाहून नेतात. जशी चक्रीवादळ हलक्या वस्तू आकाशात नेतात. त्याच प्रकारे हे चक्रीवादळ पाण्याच्या पृष्ठभागावर देखील सक्रिय असते.

हे प्राणी वादळासह उडत राहतात आणि वाऱ्याचा वेग कमी होईपर्यंत आकाशात राहतात. जेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो तेव्हा हे चक्री वादळ आकाशात सर्वत्र मुसळधार पावसाच्या स्वरूपात सर्वत्र पसरतात आणि अशा प्रकारे पावसाच्या पाण्याने समुद्री जीव (मासे, बेडूक, कासव, खेकडे) खाली पडायला लागतात.

चक्री वादळ येणे आणि पाऊस पडणे या दोन्ही प्रक्रिया एकाच ठिकाणी नाही घडत. चक्रीवादळ उठण्यास आणि थांबण्यास खूपच उशीर/ वेळ घेते आणि तोपर्यंत त्याने बरेच किलोमीटर पार केलेले असते. असेही म्हंटले जाते की ज्या ठिकाणी चक्री वादळ उद्भवते तेथे पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी असते परंतु चक्री वादळ समुद्र भोवतालच्या प्रदेशात असेल तर पाऊस पडणार असण्याची शक्यता जास्त असते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आणि बिल इव्हान्सच्या (Bill Evans) हवामानशास्त्रीय पुस्तक 'इट्स रेनिंग फिश अँड स्पायडर' (‘It's Raining Fish and Spiders’) नुसार दर वर्षी सुमारे 40 वेळा अशा घटना जगातील बर्‍याच ठिकाणी पाहिल्या जातात.

नक्की वाचा >> काळ्या मुंग्या Black Ants का चावत नाहीत ?

या प्रक्रियेत, जे हलके समुद्री जीव वरच्या बाजूला खेचले जातात, कधी कधी त्यांच्या शरीरावर बर्फ जमा होऊन ते गोठून जातात, जो पाऊस पडल्या नंतरही आपल्याला खूप आश्चर्य आणि धोकादायक ठरू शकते. मंडळी या लेखावरून तुम्हाला हे समजले की मासे किंवा इतर प्राणी पावसाच्या पाण्याने कसे पडण्यास सुरुवात करतात. आता निश्चितच तुम्ही दुसऱ्या व्यक्तींनी सांगितलेल्या भाकड कथांवर विश्वास ठेवणार नाहीत.

भारतात पडलेला मासांचा पाऊस (Fish Rain in India)... !!

इंटरनेट वर थोडी पाहणी केल्यानंतर तुम्हाला जाणवेल कि जुलै २०१६ मध्ये, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर "आकाशातून खाली पडणाऱ्या" माशाचे (Fish Rain) अहवाल आणि छायाचित्रे आढळतील. खरं तर, तुम्हाला बरेचसे व्हिडीओस पाहायला मिळतील ज्यामध्ये लोक रस्त्यावरील मासे पकडताना दाखवण्यात आले आहे ती चित्रफीत २०१६ सालची आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये, अशीच एक घटना घडली गेली, जेव्हा जयपूरमधील खानसूरजपूर गावात मुसळधार पावसात आकाशातून मासे पडत असताना तेथील रहिवाशांनी पाहिले.

अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क-जोशमराठी
अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क-जोशमराठी

तसेच सांगायचे झाले तर काही वृत्तपत्रांनी त्याआधी, जून २०१५ मध्ये, आंध्र प्रदेशातील गोलमूडी आणि पल्लगिरी या गावांमध्ये 'मत्स्य पाऊस' (Fish Rain) झाल्याची बातमी दिली होती. त्यामध्ये रहिवाशी सांगतात, "मला वाटलं की हा विनोद आहे पण जेव्हा मी बाहेर गेलो तेव्हा मलासुद्धा माझ्या  घरामागील अंगणात आणि रस्त्यावर मासे सापडले."

होंडुरासचे LLUVIA DE PECES OR 'RAIN OF FISH'

सध्याच्या शंभराहून अधिक वर्षांपासून, मध्य अमेरिकेचा होंडुरास देश (American country of Honduras) हा आकाशातून मासे बारसण्याचा साक्षीदार राहिलेला आहे. त्या देशामध्ये एक सण ठेवला जातो ज्याला Lluvia de Peces असे म्हणतात. त्याचा असा अर्थ आहे कि आकाशातून पडणारा माशांचा पाऊस 'Rain of Fish'.

या देशात पौराणिक कथा अशी आहे की 1800 च्या उत्तरार्धात जोसे सुबिराणा नावाच्या याजकाच्या प्रार्थनांनी हा चमत्कार घडवून आणला. जेव्हा राष्ट्र गंभीर दारिद्र्याने पीडित होते तेव्हा फादर सुबिराणा यांनी कायमचे उपासमारीची समाप्ती होण्याकरिता प्रार्थना केली आणि देवाने त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर विभागीय डो योरो (Yoro) येथे माशांचा वर्षाव करून दिला.तेव्हापासून ही वार्षिक घटना घडत आहे.

नक्की वाचा >> भारतातील ११ रहस्यमयी मंदिरे (Top 11 Mysterious temples)

वनस्पतिशास्त्रज्ञ आणि अन्वेषक अलेक्झांडर वॉन हंबोल्ट (Alexander von Humboldt) यांनी 1698 च्या माउंटनच्या ज्वालामुखीय विस्फोटाबद्दल लिहिले होते. त्यांच्याद्वारे कॅरिहुआराझो डोंगर ज्याने योरो (Yoro) देशाला चिखल आणि मासे शक्यतो भूमी अंतर्गत नदी किंवा तलाव ज्वालामुखीशी जोडले गेले असतील असा तर्क लावला , सुमारे चाळीस-चौरस मैलांचे क्षेत्रही व्यापले होते सांगण्यात येते.

अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क-जोशमराठी
अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क-जोशमराठी

१९७० च्या दशकात नॅशनल जिओग्राफिकने ल्लूव्हिया दे पेसेस (LLUVIA DE PECES) वर संशोधन सुरू केले. अखेरीस, त्यांच्या पथकाला हे आढळले की आकाशातून पडणारे मासे स्थानिक खार्या पाण्यातील नसून ते गोड्या पाण्यातील आहेत. एक सिद्धांत असा उत्साहवर्धक पोस्ट करतो की मासे भूमिअंतर्गत नद्यांमध्ये राहत आहेत आणि काही काळानंतर त्यांच्यावर अशी परिस्तिथी येते कि त्यांना जमिनीच्या बाहेर येणे भाग पडते. ह्या वरील प्रमाणे सांगितलेल्या घडणाऱ्या गोष्टीबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. होंडुरास , योरो देशात राहणाऱ्या रहिवाश्याना वाटते कि हा विचित्र तसेच रहस्यमय प्रकार आहे परंतु विज्ञानाने वैज्ञानिक व शास्त्रीय कारणे दिली आहेत.


खालील विडिओ मधून तुम्ही Fish Rain पाहू शकता


मित्रानो साहजिकच वर सांगितलेल्या कारणांवरून तुम्हाला समजलेच असेल कि माशांचा पाऊस (Fish Rain) का पडतो ? आणि आता तुम्हाला त्याचे आश्चर्य वाटत नसेल कारण ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. वरील लेखातून आपण आकाशातून मासे का बरसतात ?, भारतात पडलेला मासांचा पाऊस (Fish Rain in India), होंडुरासचे LLUVIA DE PECES OR 'RAIN OF FISH या विषयी (Fish Rain in marathi) माहिती पाहिली आम्ही आशा करतो कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.

मंडळी वरील लेख तुम्हाला कसा वाटला ? तसेच या लेखाबाबत काही शंका असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुमचा अभिप्राय हा आमच्यासाठी मौल्यवान आहे त्याच्याद्वारेच आम्हाला नवनवीन लेख लिहण्यास प्रेरणा मिळते. जोशमराठी संकेतस्थळ नेहमीच ज्ञान-रंजन विभागात विभागात रोचक व मदतगार माहिती आणत असते. हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी नक्की शेयर करा. धन्यवाद... !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने