कोरोना विषाणू (Coronavirus) देशात पुन्हा डोके वर काढत असतानाच कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील देशभरातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण (corona vaccination) मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्यानंतर आता येत्या १ मार्चपासून केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण (covid-19-vaccine-registration) सुरू करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री यांनी केली आहे.
पहिल्या टप्प्यातील लसीकरनात केवळ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लसी (Corona Vaccine) उपलब्ध करून देण्यात आली होती पण आता लसीकरणाच्या मोहिमेत दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रत्यक्ष सामान्य नागरिकांचा सहभाग या मोहिमेत लवकरच करण्यात येईल. या प्रक्रियेबद्दल एकंदरितच उत्सुकता, संभ्रम, भिती अशा भावना जनमाणसांतून उमटणे साहजिकच असेल.
१ मार्चपासून Corona Vaccine मिळणार, पण कुणाला आणि कशी ? जोशमराठी |
प्रकाश जावडेकर यांनी कोरोनावरील लसीकरणाची घोषणा करताना सांगितले की, येत्या १ मार्चपासून देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. देशभरातील १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण (Corona Vaccine) केले जाईल. दरम्यान, सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत असेल.
दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कोणासाठी उपलब्ध असेल व लसीकरणाची (covid-19-vaccine-registration) प्रक्रिया काय असेल हे आज जाणून घेऊ.
कोरोना लसीकरण मोहीम
आत्ता पर्यंत १ करोड ५२ लाखाच्या आसपास कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लसीचे २ डोस देण्यात आले आहेत.
१ मार्चपासून आता सुरु होत असलेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वय वर्ष ६० नंतरच्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षे वय असलेल्या पण गंभीर आजार ग्रस्त असलेल्या नागरिकांनाच फक्त प्राधान्याने लस देण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
नक्की वाचा >> पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता
पहिला टप्पा व दुसरा टप्पा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर उरलेल्या इतर नागरिकांना तिसऱ्या टप्प्यातील लसीकरन मोहिमेत लस देण्यात येईल .
गंभीर आजार ग्रस्त असलेले नागरिक खालील दुसऱ्या टप्प्यात लसीकरणास पात्र राहतील –
१) किडनी विकार, लिव्हर, दीर्घकालीन हृदय आणि मेंदू संबंधीचे आजार / विकार.
२) एपिलेप्सी (Epilepsy)
३) अस्प्लेनिया आणि स्प्लेनिक डिसफंक्शन (Asplenia and splenic dysfunction)
४) मधुमेह (Diabetes)
५) लठ्ठपणा (Obesity)
१ मार्चपासून Corona Vaccine मिळणार, पण कुणाला आणि कशी ? जोशमराठी |
६) अस्थमा, सिस्टिक फॅब्रीओसिस, दीर्घकालिन श्वसन आजार, Chronic Obstructive Pulmonary Disease (COPD) .
७) बोन मॅरो (bone marrow), स्टेम सेल ट्रान्सप्लांट (stem-cell transplantation)
८) एखाद्या आजारामुळे नष्ट झालेली रोगप्रतिकारकशक्ती.
९) कॅन्सर (Cancer)
(Corona Vaccine) लसीकरण केंद्र
कॉव्ही शिल्ड (Covi Shield) आणि कोव्हॅकसिन (Co Vaccine) या दोन लसी सध्या भारत सरकारकडे उपलब्ध असून या लसी २० हजार खासगी तसेच १० हजार सरकारी दवाखान्यासह लसीकरण केंद्रांतून देण्यात येणार असून त्यामधील फक्त सिरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्डच खासगी केंद्रांवर उपलब्ध करण्यात येणार असेल. सरकार कडून केंद्रांबाबत यापेक्षा अधिक माहिती व लसीच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण अजून देण्यात आलेले नाही.
नोंदणीसाठी कोणती ओळखपत्रे वैध असतील?
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), मतदार ओळखपत्र (Voter Identity Card), आधार कार्ड (Aadhar Card), पासपोर्ट (Passport), पॅनकार्ड (PAN Card), मनरेगा कार्ड (MGNREGA Card), आरोग्य विमा स्मार्ट कार्ड (Health Insurance Smart Card), जॉब कार्ड (Job Card), खासदार, आमदार व एमएलसी यांनी दिलेली अधिकृत ओळखपत्र इत्यादी ओळखपत्र नोंदणीस वैध धरले जातील.
(Corona Vaccine) लसीकरणाची प्रक्रिया कशी असेल ?
१. सर्व अटींमध्ये बसणाऱ्या नागरिकांसाठी सेल्फ रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे नागरिकांची मतदान यादी सरकारकडे असून सुद्धा इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे .
२. लसीकरण नोंदणीकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी .आरोग्यसेतु (Aarogya Setu), को-विन (Co-Win), ठराविक रुग्णालय आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर लसीकरणासाठी नोंदणी केली जाणार आहे.
३. को-विन (Co-Win App) हे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन (covid-19-vaccine-registration) करून घेण्याचे प्रमुख अँप ठरेल. या अँपवरून तुम्ही नाव नोंदणी, तसेच लसीकरणानंतर मिळणारे सर्टिफिकेट आपल्याला सहज डाऊनलोड करता येईल.
४. आपले नाव नोंदवण्यासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ओळख पत्र जसे की – आधार (Aadhar Card), वोटिंग कार्ड (Voting Card) इत्यादींची आवश्यकता असेल. इतर लोकांना जे आपल्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा लोकांनी मेडिकल सर्टिफिकेट फॉर्मशी जोडणे अनिवार्य असेल.
५. सरकारी यंत्रणेकडून इतर गंभीर आजारांसाठी एक वेगळा फॉर्म जारी करण्यात येऊ शकतो. नागरिकांनी तो भरून आपले रजिस्ट्रेशन (Registration) करणे अनिवार्य असेल. हा फॉर्म सुद्धा को-विन वरच उपलब्ध करून दिला जाईल.
६. लसीकरण संपूर्णतः प्रथम या व प्रथम घ्या (First come First serve) या आधारावर असणार आहे”. म्हणून स्लॉट बुक (Slot book) करून लसीकरणात सहभागी होणे किंवा ओपन स्लॉट (Open slot) अशा दोन पद्धतींचा अवलंब करण्यात येणार आहेत.
७. नागरिकांचे रजिस्ट्रेशन (covid-19-vaccine-registration) झाल्यानंतर, आपल्याला एक ठराविक वेळ तसेच ठिकाण ठरवून दिले जाईल. आपण गर्दी टाळण्यासाठी दिलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन करणे खूप आवश्यक असेल.
नक्की वाचा >> अबब या देशात पडतो Fish Rain रहस्य जाणून व्हाल थक्क
८. लसीकरणाच्या किंमतीबद्दल ठोस स्पष्टीकरण अजून मिळालेले नसले तरी सरकारी केंद्रांवर लसीकरण अगदी मोफत असेल तर खाजगी केंद्रांवर ३०० पर्यंत शुल्क आकारले जाण्याची शक्यता असेल.
९. वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा एक डोस घ्यावा लागणार आहे. पण त्यावेळी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीच आवश्यकता नसणार आहे.
नागरिकांनी लसीकरणानंतर खालील काळजी घेणे.
१. लस घेतलेल्या ठिकाणी आग होणे, सूज, खाज उठणे, त्वचा थोडीसी लालसर होणे.
२. अशक्तपणा किंवा थकवा येणे.
३. पायांवर सूज येणे.
४. ताप येणे.
वरील या प्रकारची लक्षणं दिसली तरी घाबरून जाऊन व पुढचा डोस टाळण्याचे काहीही कारण नाही. दोन दिवस हा त्रास होऊन तिसऱ्या – चौथ्या दिवशी कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास, लसीकरण करून घेतलेल्या केंद्रावरील अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधणे नागरिकांकडून अपेक्षित आहे. देण्यात येणाऱ्या दोन्ही लसी सुरक्षित असल्यामुळे मोठी प्रतिक्रिया (Reaction) येण्याची संभावना कमीच आहे.
इतर नागरिकांसाठी लसीकरण
इतर नागरिकांसाठी दुसरा टप्पा पार पडल्या नंतर लसीकरण सुरु होणार आहे. त्याला आणखीन २ महिन्यांचा अवधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाकडून लहान मुलांचे व गरोदर स्त्रियांचे लसीकरण कधी होईल ह्याबद्दल अजून ठोस माहिती दिली गेली नाही.
“लस जरी सुरक्षित असली तरी लहान मुलांवर, गरोदर स्त्रियांसाठी किती सुरक्षित आहे याची पडताळणी सुरु आहे. तरी लवकरात लवकर त्यांना सुद्धा लस देण्यात येईल.” असे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेले ट्विट :
From March 1, people above 60 years of age and those above 45 years of age with comorbidities will be vaccinated at 10,000 govt & over 20,000 private vaccination centres. The vaccine will be given free of cost at govt centres: Union Minister Prakash Javadekar#COVID19 pic.twitter.com/Rxhkkk8eSC
— ANI (@ANI) February 24, 2021
मंडळी तुमचा अभिप्राय हा आमच्यासाठी मौल्यवान आहे त्याच्याद्वारेच आम्हाला नवनवीन लेख लिहण्यास प्रेरणा मिळते. जोशमराठी संकेतस्थळ नेहमीच ज्ञान-रंजन विभागात विभागात रोचक व मदतगार माहिती आणत असते. हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी नक्की शेयर करा. धन्यवाद... !!
टिप्पणी पोस्ट करा