NASA काय आहे ? Facts about NASA. | joshmarathi

नमस्कार मित्रांनो पृथ्वी ,सूर्य ,तारे ,ग्रह ,चंद्र यांच्याबाबत आपल्याला नेहमीच कुतूहल वाटते . शाळेत असताना भूगोल विषयाच्या धड्यांमधून आपल्याला बरीच माहिती मिळून गेलेली आहे. आपल्याला ते जाणून घेत असताना अनेक प्रश्न पडतात जसे या सर्व अंतराळाबद्दल आपल्याला माहिती कोण देते ? पृथ्वीच्या वातावरणाबाहेर कोणतच माध्यम नाही तरी रॉकेट तिथं पर्यंत जाते तरी कसे ? इतक्या लांबचा पल्ला गाठण्यासाठी किती इंधन लागत बरं ?

या अशा पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे अंतराळ मोहीम करणाऱ्या संस्थेकडे आहे . आता त्या संस्था कोणत्या असतील तर तुम्हाला त्या संस्थांबद्दल जाणून द्यायला अधिकच रुची वाटेल. अमेरिकेची नासा (NASA) व भारताची इस्रो संस्था (ISRO) अंतराळ गतिविधीचे निरीक्षण व अभ्यास करतात. या लेखात आपण नासा या संस्थेशी संबंधित माहिती पाहणार आहोत. नासा चा फुलफॉर्म (NASA Fullform) काय ? नासा कोठे स्थित आहे ? नासाची स्थापना कधी झाली ? चला तर मंडळी पाहुयात अंतराळ गतिविधीचा अभ्यास करणाऱ्या नासा संस्थेबाबत रूचत तथ्य आणि संपूर्ण माहिती.

नासा काय आहे / What is NASA ?

नासा - NASA (नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन - National Aeronautics And Space Administration) ही अमेरिकेची एक स्वतंत्र शाखा आहे जी उपग्रहांच्या (Satellites) माध्यमातून अवकाश विषयावर संशोधन (Research) करते आणि त्यासंदर्भात अवकाशयान पाठवते. अंतराळ कार्यक्रम आणि वैमानिकी (Aeronautics) विषयी संशोधन करणे हे नासाचे प्रमुख कार्य आहे.

नासा (NASA) या शाखेत उपग्रह (Satellites) तयार केले गेले आहेत, ज्याच्या सहाय्याने शास्त्रज्ञ पृथ्वीसह अंतराळातील सर्व ग्रहांबाबत अधिक संशोधन करतात, त्यांचा शोध व माहिती मिळवतात. नासा सौर मंडळाच्या आतच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन अभ्यास करते. जेथे नवनवीन शोध आहेत, जे मानवजातीचे जीवन सुखकर आणि सोपे करण्यासाठी कार्य करतात. अंतराळ हा विषय नेहमीच कुतूहलजन्य राहिलेला आहे.

NASA काय आहे ? Facts about NASA. | joshmarathi
NASA काय आहे ? Facts about NASA. | joshmarathi

१ ऑक्टोबर १९५८ रोजी राष्ट्राध्यक्ष आइसनहॉवर (President Eisenhower) यांनी नासाची सुरूवात केली. अंतराळ अन्वेषणात अमेरिकेला प्रगतीपथावर पोहचवणे. तसेच वैमानिकी संशोधन क्षेत्रात (aeronautics research) अमेरिकेचा विकास करणे , NASA या संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्दीष्ट होते. नासा ला चालविण्याचे काम administrator च्या हातात असते ज्याचं नाव president द्वारा दिले जाते आणि त्यानंतरच तेथील senate च्या द्वारा निवडणूक घेऊन त्याच नाव निवडण्यात येते.

नासा चे हेडडक्वार्टर कोठे आहे / Where is NASA headquarters?

नासाच्या कार्याबद्दल जाणून घेण्याव्यतिरिक्त, ते कोठे आहे हे देखील लोकांना माहित असणे फार गरजेचे आहे , म्हणजे नासा कोणत्या देशात आहे, त्याचे मुख्यालय कोठे आहे, सांगायचं झाले तर NASA चे हेडडक्वार्टर वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC.)आहे. अंतराळवीर अवकाशात जाऊन ऑर्बिटमध्ये बरेच काळ वैज्ञानिक संशोधन करतात. पृथ्वीच्या कक्षेत सोडलेले उपग्रह आपल्यास पृथ्वीबद्दल बरीच माहिती देतात.

Full Form of Nasa in English - NATIONAL AERONAUTICS AND SPACE ADMINISTRATION असा आहे. तसेच त्याला मराठी मध्ये राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ व्यवस्थापन करणारी संस्था म्हणतात.

नासाचा इतिहास (History of NASA)

१ ऑक्टोबर १९५८ रोजी नासाची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून या संस्थांनी सातत्याने अनेक यश संपादन केले. अंतराळात मानवांना अनेक ग्रह व उपग्रह याच्या मोहीमा उपलब्ध करून दिल्या . नासाची स्थापना होऊन जवळ जवळ ६० वर्षे झाली आहेत. याच ६ दशकात मानवाची क्षमता आणि त्याच्या महत्वाकांक्षाची उंच भरारी खूपच दूरवर गेलेली पाहायला मिळते. ब्रह्मांड आणि पृथ्वीविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे आणि नवीन अवकाश तंत्रज्ञानाचा शोध लावणे हाच नासाचा प्रमुख हेतू राहिलेला आहे.

१९५७ मध्ये सोव्हिएत युनियनने आपल्या संस्थेकडून स्पुतनिक (sputnik) नावाचा उपग्रह अवकाशात पाठविला तेव्हा नासाची (NASA) निर्मिती सुरू झाली. त्यावेळी अमेरिका आणि रशिया या देशांमध्ये स्पर्धा जोरात होती आणि महायुद्धानंतर दोन्ही देशांमध्ये शीत युद्ध सुरू झाले होते. रशियाने स्पुतनिक (sputnik) हा उपग्रह अवकाशात पाठविला, त्याच प्रकारे अवकाश संस्था बनवण्याच्या दिशेने अमेरिकेनेही काम सुरू केले.स्पेस आणि एरोनॉटिक्समध्ये यश मिळवण्यासाठी अमेरिकेने ऑक्टोबर 1958 मध्ये नासाची स्थापना केली.

नक्की वाचा >> फटाक्यांचा (Firecrackers History in India) इतिहास आणि भारत

नासाने (NASA) बनवलेला सर्वात यशस्वी प्रकल्प अपोलो प्रोग्राम (Apollo Program) होता जो 1960 च्या उत्तरार्धात तयार झाला होता आणि 1969 मध्ये अपोलो कमांड मॉड्यूल (Apollo Command Module) चंद्रापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळ यान आणि नील आर्मस्ट्रांग (Neil Armstrong) चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर होते.

नवीन नवीन आयाम सतत स्थापित करण्यासाठी स्कायलाब ला (Skylab) जागेत तैनात केले गेले. 1976 मध्ये वायकिंग प्रोब (Viking probes) मंगळावर पोहोचले. त्यानंतर व्हॉएजर (Voyager) 1 आणि 2 ची यांचा नंबर आला ज्यांना अंतराच्या दीर्घ प्रवासावर पाठविले गेले होते, जे आजही पृथ्वीपासून खूप दूरवर जात आहेत. व्हॉएजर 1 आणि 2 दोघांना वेगवेगळ्या दिशेने पाठविण्यात आले आहे.

पहिले Voyager 2 यान लाँच केले गेले आणि त्याच्या ठीक 16 दिवसांनंतर त्याचे जुळे यान प्रवास Voyager 1 अंतराळ प्रवासावर पाठवले गेले. ही याने अंतराळात पाठवून 42 वर्षे लोटली आहेत, तरीही आज ते डीप स्पेस नेटवर्कच्या (Deep Space Network) माध्यमातून पृथ्वीवर डेटा प्रसारित करत आहेत.1983 च्या वर्षात प्रथमच अमेरिकेने पहिली महिला अंतराळात पाठविली, अशा प्रकारे सेली क्रिस्टन (Sally Kristen) अमेरिकन पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या .

24 एप्रिल 1990 रोजी हबल स्पेस दुर्बिणीचे (Hubble space telescope) प्रक्षेपण करण्यात आले. या दुर्बिणीचे नाव अमेरिकन अंतराळवीर एडविन पी. हबल (Edwin P. Hubble) यांच्या नावावर आहे. डॉ हबल यांनी बिग-बैंग सिद्धांताविषयी (big-bang theory) सांगितले आणि हे अंतराळ निरंतर विस्तारत असल्याचेही सांगितले

नासा संस्थेविषयी काही रोचक तथ्य (Interesting Facts about NASA)

१) अपोलो हा नासाने चंद्रावर पाठवलेला पहिला उपग्रह होता.

२) NASA या अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेवर दरवर्षी १९ अब्ज डॉलर्स खर्च केले जातात .

३) जोपर्यंत जो व्यक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अवकाशात 50 मैलांचा प्रवास करत नाही तोपर्यंत नासा त्याला अंतराळवीर मानत नाही.

४) एका माहितीनुसार नासा येथे काम करणारे 36% अभियंते भारतीय आहेत.

५) नासाने पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधला आहे. ज्यावर भरपूर पाणी अस्तित्त्वात आहे. तो ग्रह पृथ्वीपासून ४० प्रकाश वर्षे दूर आहे. या ग्रहाला वॉटर वर्ल्ड (Water World) असेही म्हणतात.

६) माहितीनुसार आपण अंतराळात रडू शकत नाही. कारण आपल्या डोळ्यातून अश्रू फुटत नाहीत.

नक्की वाचा >> उपग्रह (Satellite) म्हणजे काय? कार्य प्रणाली? | Joshmarathi

७) तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही कि , अंतराळात पृथीच्या तुलनेत अधिक पाण्याचे भांडार आहेत.

८) नासाची इंटरनेट गती (internet speed) 97 जीबीपीएस (Gbps) आहे.

९) नासाचे सर्वात मोठे लक्ष्य म्हणजे 2030 पर्यंत मानवाला मंगळ ग्रहावर पोहचवणे.

१०) 2006 मध्ये नासाने कबूल केले की त्यांच्याकडे चंद्रावर लँडिंग केलेला वास्तविक व्हिडिओ नाही.

११) संशोधनाची चाचणी घेण्यासाठी हाय-स्पीड, उच्च उंचीच्या वैमानिकीय SR-71 किंवा "ब्लॅकबर्ड" (Blackbird) म्हणून ओळखले जाणारे नासाद्वारे वापरलेले संशोधन विमान आहे. 1950 च्या दशकात, हे लॉकहीडच्या प्रगत विकास कंपनीमध्ये गुप्तपणे डिझाइन केले गेले होते ज्यास "स्कंक वर्क्स" (Skunk Works) म्हणून ओळखले जाते.

१२) नासाने नवीन कर्मचार्‍यांना आरमागेडन (Armageddon) नावाचा चित्रपट देखील दर्शविला आणि नंतर चित्रपटातील चुकीच्या गोष्टींबद्दल त्यांना प्रश्न विचारले गेले. किमान 168 चुका ओळखल्या गेल्या

१३) नासाने स्पेसशिपची आखणी केली होती ,जी येणाऱ्या लघुग्रहांना दूर करण्यासाठी विभक्त स्फोटाचा वापर करण्यास सक्षम होती.

१४) 26 नोव्हेंबर, 2011 रोजी, नासाने मंगळावर मिशन सुरू केले आणि 6 ऑगस्ट, 2012 रोजी ते मंगळावर सूक्ष्मजीव जीवनासाठी समर्थन देईल हे निश्चित करण्यासाठी मंगळावर अवतरले.

अंतरिक्ष इतके विस्तीर्ण आहे की आजपर्यंत कोणालाही त्याच्या सीमेची माहिती नाही, अंतराळ अमर्याद किंवा ज्याला मर्यादाच नाही असे म्हणता येईल. परंतु बर्‍याच देशांच्या अवकाश संस्थाया त्याचे रहस्य लपवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. या अंतराळाशी निगडित सर्व गोष्टींचा अभ्यास करणारी संस्था म्हणजे NASA बाबत आपण बरीच माहिती पाहिली.

मंडळी नासा काय आहे / What is NASA ?, नासा चे हेडडक्वार्टर कोठे आहे / Where is NASA headquarters?, नासाचा इतिहास (History of NASA) ह्या सर्व प्रश्नांबाबत पुरेशी माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी आशा आम्ही करतो. तुम्हाला या लेखाबाबत काही शंका असतील तर कंमेंट करून तुम्ही विचारू शकता तसेच तुमचा अभिप्राय नक्की कळवा. हा लेख तुम्ही तुमच्या प्रिय जणांशी शेयर करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने