Emoji म्हणजे काय आणि Emoji कसे बनवायचे?

स्माइली शिवाय आपल्या गप्पा गोष्टी (Chat) जुन्या काळातील ब्लॅक अँड व्हाईट (Black and white) चित्रपटासारखे बेरंगी होऊन गेले असते. प्रेम, उत्साह, आणि क्रोध व्यक्त करणाऱ्या या इमोजी (Emoji) बाबतचे रोचक तथ्य जाणून घेऊ तसेच इमोजी अस्तित्वात कसे आले व त्याचा इतिहास कसा हे जाणून घेऊया या लेखातून तर मग चला मंडळी जाणून घेऊया.

सोशिअल मेडिया (Social Media) ने संपूर्ण जगाला आपल्या स्मार्ट फोन (Smart phone) मध्ये सामावून एक मोठे परिवार बनवून टाकले आहे. आजच्या युगात ज्या प्रौढ व्यक्तीकडे स्मार्ट फोन नसेल ती व्यक्ती गरीब आहे असे समीकरण तयार झाले आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही कारण आजच्या परिस्थिती नुसार लहान मुलं पासून ते मोठ्या व्यक्तींकडे स्मार्ट फोन असतोच असतो.

माणूस स्मार्टफोनच्या व सोसिअल मीडियाच्या विळख्यात इतका अडकला आहे कि आपली मैत्री ,नाते किंवा जोडीदार देखील तो फोन व सोसिअल मीडियाद्वारे निवडू इच्छित आहे. स्मार्टफोन वापरणारे सोशिअल मेडिया जसे फेसबुक (Facebook), व्हाट्सएप्प (WhatsApp), हाइक (hike), इंस्टाग्राम (Instagram) वर तासनतास ऍक्टिव्ह (Active) असलेले पाहावयास मिळतात.

नक्की वाचा >> फटाक्यांचा (Firecrackers History in India) इतिहास आणि भारत

जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीसमोर बसून त्याचाशी चर्चा ,गप्पा गोष्टी करत असतो , तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या हाव भाव आणि बोलण्याची पद्धतीमुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा अंदाज लागून जातो. परंतु सोशिअल मीडिया वर आपण टेक्स्ट मेसेज (Text Message) पाठवतो ज्यामध्ये फक्त शब्द एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात , भावना जात नाहीत.

असे खूप सारे प्रसंग आपल्याशी घडतात जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या भावना (Emotions) समजण्यात अपयशी ठरतात किंवा Emotions व्यक्त करू शकत नाहीत त्यामुळेच ईमोजी (Emoji) आपल्या भावना Pictorial Representation म्हणून वापरल्या जातात .

Emoji म्हणजे काय आणि Emoji कसे बनवायचे?
Emoji म्हणजे काय आणि Emoji कसे बनवायचे?

ईमोजी (Emoji) स्माईली चा चेहरा भावना व्यक्त करण्याचा सोपा व जलद मार्ग आहे. तर चला मित्रानो आता आपण जाणून घेऊया कि ईमोजी म्हणजे काय ? (What is Emoji in marathi) इमोजीला मराठीमध्ये काय म्हणतात ? ईमोजी कसे ओळखायचे ? ईमोजी (Emoji) बाबतची संपूर्ण माहिती.


ईमोजी म्हणजे काय ? (What is Emoji?)

ईमोजी हे Emoticons पिवळ्या रंगाचे कार्टून्स सारखे चेहरे असतात ,ज्यांना वेगवेगळ्या भावनांना व्यक्त करण्यासाठी Expression Face नुसार बनवले जाते. त्यालाच आपल्या भाषेत स्माइली (Smiley) म्हंटले जाते.

इमोजी हाव भाव, स्थळ, वस्तू ,स्तिथी या गोष्टींनी दर्शवले जातात. Emoji हा शब्द जपान मध्ये मेसेज (Message) किंवा (Web page) वर प्रयोग केले जाणारे स्माइली म्हणजे Ideograms होते , त्याचा अर्थ Pictogram असा आहे जे Picture + Letter या दोहोंच्या एकत्रीकरणामुळे बनला आहे.

मित्रानो आता आपण पाहिले (what is Emoji in marathi) पुढे आपण पाहुयात Emoji Details in marathi आणि ईमोजी कसे बनवले जातात (How to create an emoji?) तर मित्रानो हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यन्त वाचायला हवा.


ईमोजी कसे बनवायचे ? / How to make emojis ?

जागतिक World Emoji Day १७ जुलै या दिवशी साजरा करतात. जसे आपल्याला विकिपीडियावर (Wikipedia) आपल्याला विविध प्रकारची संपूर्ण माहिती मिळते तसेच इमोजीपेडिया वर (Emojipedia) आपल्याला ईमोजी विषयी संपूर्ण माहिती मिळते. तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का ईमोजी पिवळ्या रंगाचे का असतात ? (Why are emojis yellow?) तर मित्रानो पिवळा रंग हे हास्याचे प्रतीक मानले जाते व तसेच या रंगाच्या Background वर चेहऱ्याचे हाव भाव स्पष्ट दिसतात.

मुळात इमोजी फक्त जपानचे NTT, Docomo आणि Operator वर पाहायला मिळत होते. पण काही ईमोजी कॅरॅक्टरसाठी Unicode चा प्रयोग केला गेला कारण त्यांना Windows Phone 7 तसेच iPhone वर Japenese Operator शिवाय Access केले जाऊ शकत होते. अँड्रॉइड (Android) आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर (iOS Platform) असे अनेक अ‍ॅप्स अत्याधुनिक सेवा प्रदान करतात, ज्याच्या मदतीने आपण आपले वैयक्तिकृत इमोजी तयार करू शकता. मेकमोजी (Makemoji) असे एक अ‍ॅप आहे ज्याद्वारे आपण ईमोजी (emoji) सोप्या पद्धतीने बनवू शकतो.


ईमोजी चा इतिहास (History of Emoji)

इमोजी बनवणारे सर्वप्रथम शिगेताका कुरीता (Shigetaka Kurita) होते, ज्यांनी 1999 मध्ये केवळ जपानी यूझर बेससाठी बनवले होते. जगातला पहिला इमोजी अगदी सोपा होता - केवळ 12 पिक्सेल बाय 12 पिक्सेल वापरुन - आणि Shigetaka Kurita ने तयार करण्यासाठी मंगा आर्ट (Manga Art) आणि कांजी पात्रांमधून (kanji characters) प्रेरणा घेतली होती.

कुरीता त्यावेळी डोकोमोच्या डेव्हलपमेंट टीममध्ये (DOCOMO Development Team) काम करायचे, जे त्यावेळी ‘आय-मोड’ साठी काहीतरी डिझाइन करत होते. हा आय = मोड (i =mode)हा जपानचा (Japan) मुख्य मोबाइल कॅरियर (Mobile Carrier), डोकोमोचा प्रारंभिक मोबाइल इंटरनेट प्लॅटफॉर्म (Mobile internet platform) होता. त्या वेळी कुरीता यांना एक अतिशय आकर्षक इंटरफेस डिझाइन करायचा होता जेणेकरून माहिती सोप्या आणि आकर्षक मार्गाने संभ्रमित होऊ शकेल.

आंतरराष्ट्रीय स्थरावर सर्वप्रथम ईमोजी ला Apple Inc. ने त्यांच्या आयफोनमध्ये (iPhones) वापर केला. या वैशिष्ट्याचा (feature) उपयोग त्यावेळी फक्त जपानच्या ग्राहकांना (japanese customers) आकर्षित करण्यासाठी केला होता पण एप्पल च्या सर्व वापरकर्त्यांना त्या वैशिष्ट्याबद्दल माहिती मिळाली आणि लोकांनी त्याला भर भरून प्रतिसाद दिला. त्या कारणास्तव एप्पल कंपनीला अधिकृतपणे ईमोजी जाहीर करावे लागले.


इमोजी कसे वापरावे ? How To Use Emoji in marathi.

संभाषणात (Communication), इमोटिकॉन अनेक प्रकारे वापरले जाऊ शकतात, आपण त्यांना लायब्ररीतून निवडू शकता किंवा टाइप करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता. इमोटीकॉन्स टाइप करणे सोपे आणि जलद आहे. पण आताच्या घडीला ईमोजी हे सोसिअल मीडिया एप्प वर इनबिल्ट असतात त्यामुळे हवी असलेली ईमोजी सिलेक्ट करून पाठवू शकता. आपण इमोटीकॉन्स की बोर्डद्वारे टाइप करू शकतो , जसे खालील टेबलमध्ये पाहू शकता.

Name Keyboard Shortcut
Smile : )
Tongue : P
Grin : D
Frown : (
Wink ; )
Glasses B-)
Gasp :O
Sunglasses B|
Unsure :/
Grumpy >:(
Cry :'(
Devil 3:)
Angel O:)
Kiss :*
Heart <3
KiKi ^_^
Squint -_-
Confused O.o
Confused Reverse o.O
Colon Three :3
Pacman :v
Upset >:O
Blessed O:-)

Emoji म्हणजे काय आणि Emoji कसे बनवायचे?
Emoji म्हणजे काय आणि Emoji कसे बनवायचे?

इमोजीची उत्क्रांती (Evolution of Emoji)

१९९९ : या साली इमोजीचा शोध लागला ! त्याच्या मूळ संचामधील चिन्ह हवामान (weather), रहदारी (traffic), तंत्रज्ञान (technology) आणि वेळ (time) दर्शवत होती.

२०१० : युनिकोडने (Unicode) अधिकृतपणे इमोजी स्वीकारले, ज्यात बरेच - मांजरीचे चेहरे भावना (Cat faces Emotions), क्रोध (anger) आणि अश्रूंचा (Cry) , हास्य (smile) यांचा समावेश होता.

२०१५ : इमोजीमध्ये एक विविधता अद्ययावत झाली ज्यात पाच नवीन त्वचा टोन आणि समलिंगी जोडप्यांचा (same-gender couples) एक संच समाविष्ट करण्यात आला .

नक्की वाचा >> उपग्रह (Satellite) म्हणजे काय? कार्य प्रणाली? | Joshmarathi

२०१६ : या साली अद्यतनांमध्ये अभिमान ध्वज (pride flag) आणि वेटलिफ्टिंग वूमन इमोजी (weightlifting woman emoji) यासारख्या बर्‍याच गोष्टींचा समावेश होता.

२०१७ : त्यानंतर नवीन इमोजी प्रस्ताव सुचविण्यात आले ज्यामध्ये वर्णांमध्ये माहिती पोहचविण्यात आली आणि त्यात बर्‍याच भाषा (language) आणि संस्कृती (culture) देखील समाविष्ट आहेत.

मित्र आणि मैत्रिणींनो मला आशा आहे की आपणास हा लेख, इमोजी म्हणजे काय आहे? (What is Emoji?), इमोजीची उत्क्रांती (Evolution of Emoji) ते आवडले असेल. इमोजी कसा तयार करायचा (How to make emojis ?) तसेच ईमोजी बद्दल संपूर्ण माहिती वाचकांपर्यंत पुरविण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे, जेणेकरून त्या लेखाच्या संदर्भात त्यांना इतर कोणत्याही संकेतस्थळ किंवा इंटरनेटमध्ये शोधावे लागणार नाही.

या लेखाद्वारे नक्कीच तुम्हाला ईमोजी विषयी सर्व माहिती मिळाली असेल, या लेखाबद्दल काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कंमेंट करून सांगू शकता तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान असतो कारण त्यामुळेच आम्हाला लेख लिहण्यास प्रेरणा मिळते मंडळी तुम्ही हा लेख फेसबुक (Facebook) ,ट्विटर (Twitter) ,इंस्टाग्राम (Instgram) , व्हाट्सअँप (WhatsApp) सारख्या प्लॅटफॉर्म्स वर तुमच्या प्रिय जणांशी शेयर करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने